नव्या धोरणानुसार नेमका काय बदल होणार?
पेट्रोल पंप कर्मचारी प्रत्येक वाहनाचं पीयूसी तपासून पाहिल्यानंतरच इंधन देईल. सरकार क्यूआर कोडसह एक डिजिटल पीयूसी सिस्टम तयार करणार आहे. या सिस्टीमच्या माध्यमातून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी त्वरित स्कॅनिंग आणि पडताळणी करता येणार आहे. हा डेटा इंटिग्रेस्टेड ऑनलाइन सिस्टमशी जोडला जाणार आहे. असं केल्याने वाहनांबद्दल सर्वत्र अपडेटेड माहिती उपलब्ध होईल. या माध्यमातून बनावट पीयूसीच्या समस्येला आळा बसण्यास मदत होणार आहे.
कधीपर्यंत लागू होणार हे धोरण?
नवीन धोरण हे केवळ वाहनचालकांना शिक्षा देण्यासाठी नाही तर जनतेमध्ये वाहनांच्या माध्यमातून होणाऱ्या वायू प्रदुषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी आहे. हा नवा नियम लागू करण्यापूर्वी जनजागृती मोहीम राबवली जाईल. वाहनचालकांना वाहनांचं पीयूसी बनवण्यासाठी एक निश्चित वेळ दिला जाणार आहे. पेट्रोल पंप मालकांनाही या धोरणाबद्दल समजावून सांगितले जाईल आणि तांत्रिकदृष्ट्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना प्रशित्रण दिले जाईल. हे धोरण लवकरच अंतिम मंजुरीसाठी सादर केलं जाणार असून जर सर्व काही नियोजनाप्रमाणे झाले तर पुढील काही महिन्यामध्ये हे नवं धोरण संपूर्ण राज्यात लागू केलं जाणार आहे.